प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय पद्धतीने वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश येत्या काही दिवसांत द्विसदस्यीय प्रभागाचा निर्णय होण्याची शक्यता ?
चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकसदस्यीय पद्धतीनुसार वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विशेष म्हणजे हे काम कधीपर्यंत पूर्ण करायचे याबाबत निवडणूक आयोगाने काहीही सांगितलेले नाही. वॉर्ड रचनेचा आराखडा कच्चा असणार असल्यामुळे राज्य सरकारकडून येत्या काही दिवसांत द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँगेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार हे द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका घेण्यासाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे एकसदस्यीय पद्धतीनुसार तयार करण्यात येणाऱ्या वॉर्ड रचनेच्या कच्च्या आराखड्यात नंतर बदल करून द्विसदस्यीय पद्धतीनुसार प्रभाग रचना होण्याची शक्यता आहे.*