इंडियन रिपोर्टर असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा जननायक पुरस्काराने सन्मानित



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

परभणी.... येथील जन सहयोग सेवाभावी संस्था व आझाद मित्र मंडळ यांच्या वतीने गेली 28 वर्ष विविध कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन  गौरविण्यात येते. 15 ऑगस्ट रोजी जरा याद करो कुर्बानी या संगीतमय कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात होते तसेच या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते .

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे एडवोकेट अशोक जी सोनी अध्यक्षस्थानी माननीय माजी खासदार व माजी मंत्री गणेश रावजी दुधगावकर विविध पक्षाचे नेते महापालिकेचे नेते पोलीस निरीक्षक रमेश गिरी तसेच इंडियन रिपोर्टर असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा महिला सेक्रेटरी श्रीदेवी पाटील इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते... 

यावेळी इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांना राज्यस्तरीय जननायक पुरस्कार 2021 माजी राज्यमंत्री माननीय गणेश रावजी दुधगावकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे परभणी जिल्हा अध्यक्ष मदन रावजी कोल्हे हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम रावजी धायजे प्रसिद्धीप्रमुख देवानंद वाकळे जन सहयोग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मेहमूद खान मोईन खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी गरजू गरीब लोकांना धान्याचे किट देऊन या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post