प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सिने इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत जे कॅन्सरवर मात करून घरी परतले आहेत. आता या यादीत प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांचादेखील समावेश झाला आहे. महेश मांजरेकर यांची एक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या नुकतीच पार पडली.महेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितली होती. नुकतीच ही शस्त्रक्रिया मुंबईतील रुग्णालयात पार पडली आणि ते घरीदेखील परतले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, १० दिवसांपूर्वी मुंबईतील एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये महेशची सर्जरी पार पडली. आता ते घरी आले असून पूर्णपणे फिट आहे. ऑपरेशन
महेश मांजरेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ते सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. महेश मांजरेकर यांनी हिंदी शिवाय तमीळ आणि मराठी चित्रपटातही काम केले आहे. त्यांनी बऱ्याच चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि काही चित्रपटात अभिनयही केले आहे. यशस्वी झाले असून घरी आल्यानंतर त्यांना बरे वाटत आहे