मुंबई दि. 23 - नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या मौदा येथे उद्या मंगळवार दि.24 ऑगस्ट रोजी नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 9 ग्राम पंचायतींच्या सर्व सरपंच उपसारपंचासह सर्व निवडुन आलेल्या पॅनल च्या पदाधिकाऱ्यांचा केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे अशी माहिती या सोहळ्याचे आयोजक आशिष बुराडे यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम पाठिंबा देण्याची भूमिका घेतली.सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समावेशक रिपब्लिकन पक्ष ते चालवीत आहेत. संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष ना रामदास आठवले साकारत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात भंडारा आणि नागपूर मधील 9 ग्राम पंचायती चे सरपंच आणि विजयी पॅनल जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत. त्या गावांची नवे आणि सरपंच यांची नावे पुढीलप्रमाणे-
1)पहेला ग्राम पंचायत - सरपंच सौ मंगला ठवकर; ;
2)निमगाव चे सरपंच सौ. शिलाताई राऊत;
3)गोपीवाडा चे सरपंच विनायक टांगले;
4)मेहेगाव - दिलीपभाऊ लांजेवार
5)कर्कापूर-प्रल्हादभाऊ आगाशे
6)बिनाखी - संतोषभाऊ बघेले( सरपंच)
7)जाम्ब - विलासभाऊ बारई( सरपंच)
8)काटी - विनोद बाभरे (सरपंच)
9)देऊळ गाव - अर्जुन उईके ( सरपंच )
या 9 ग्रामपंचायती सर्व सरपंच उपसरपंच आणि निवडून आलेले पॅनल केंद्रिय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती आशिष बुराडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले; महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर; बाळू घरडे; राजन वाघमारे आदी रिपाइं चे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.