प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह अन्य चार जणांविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्यात गोरेगाव पोलिसांनी सुमित सिंह ऊर्फ चिंटूला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.परमबीर सिंह यांच्या विरोधातील हा पाचवा गुन्हा आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक असून ते गोरेगाव परिसरात राहतात. त्यांना काही महिन्यांपूर्वी गुंडांकडून धमकी आली होती. त्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. त्यादरम्यान तक्रारदार यांची सचिन वाझेसोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. गेल्या जून महिन्यात वाझेने तक्रारदारांना हॉटेलच्या भागीदारीबाबत विचारणा करून हॉटेल व्यावसायिकाकडून वसुलीची ऑफर केली होती. जर पैशाचे कलेक्शन न केल्यास कारवाईची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.