प्रेस मीडिया वृत्तसेवा :
महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना_सदैव_कोळी_बांधवांच्या_पाठीशी "स्वर्गीय. मिनाताई ठाकरे घाऊक मासळी बाजार, सेनापती बापट मार्ग, दादर येथील गेल्या २५ वर्षापासून असलेल्या मासळी बाजारावर महापालिकेने कारवाई केली त्यासंदर्भात सर्व कोळी मासे विक्रेत्या महिला माता भगिनींनी आज महाराष्ट्र नव निर्माण सेना अध्यक्ष श्री. राजसाहेब_ठाकरे यांची भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्षा मा.नगरसेविका सौ.स्नेहलताई जाधव यांच्या समवेत घेतली व आमच्या पाठीशी तुम्ही सदैव उभे रहा अशी मागणी राजसाहेबांकडे केली.
त्यावेळी राजसाहेबांनी त्यांना आस्वत केलं मी आणि माझा पूर्ण पक्ष तुमच्यासोबत आहे आणि पुढील काही दिवसात मी स्वतः मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची तुमच्यासाठी भेट घेईन. या वर सर्व कोळी बांधवांनी साहेबांचे आभार मानून आनंद व्यक्त केला. यावेळी सरचिटणीस श्री.संदीप देशपांडे, विभागअध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, मा. नगरसेवक श्री. संतोष धुरी देखील उपस्थित होते."