त्यामुळे स्थानकांवर ओळखपत्र आणि लसीचे डोस पूर्ण झाल्याच्या पुराव्याची आता गरज लागणार नाही. मात्र, लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट खिडकीवर ई पास दाखवून प्रत्यक्ष पास घेणे बंधनकारक करण्यात आले

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

लोकल प्रवासासाठी बुधवारपासून ऑफलाइन प्रक्रिया रेल्वे स्थानकांवर सुरू झाली असताना राज्य सरकारने आज युनिव्हर्सल ट्रव्हल पास साठी सुधारित लिंक उपलब्ध करून ऑनलाइन पास देणे सुरू केले आहे. त्यामुळे स्थानकांवर ओळखपत्र आणि लसीचे डोस पूर्ण झाल्याच्या पुराव्याची आता गरज लागणार नाही. मात्र, लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट खिडकीवर ई पास दाखवून प्रत्यक्ष पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.दोन डोस घेतलेल्यांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी. त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens वर क्लिक करावे.

मोबाईल क्रमांक नमूद करावा. लगेच ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील दिसतील.त्यामध्ये जनरेट पास या पर्यायावर क्लिक करावे. तपशिलामध्ये सेल्फ इमेज या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे.

पुढील 48 तासांमध्ये लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाईलमध्ये सेव्ह करून, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकीवर सादर केल्यावर लोकल पास मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post