प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन NCB ने अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर छापा टाकला आहे. या छाप्यात एनसीबीला कोहलीच्या घरी ड्रग्स सापडले आहे. शुक्रवारपासून (27 ऑगस्ट) NCB कडून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये NCB ने आतापर्यंत एकूण 15 हून अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केलेली आहे. याच ड्रग्स तस्करांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर NCB ने छापा टाकला आहे. विशेष म्हणजे या छापेमारीनंतर NCB अधिकारी अरमान कोहलीला घरातून घेऊन गेले आहेत
ड्रग्स पेडलर्सकडून मिळाली माहिती
मागील काही दिवसांपासून NCB ने ड्रग्स तस्करीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कालपासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली जात आहे. या कारवाईमध्ये NCB च्या अधिकाऱ्यांनी 15 पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केली आहे. NCB चे अधिकारी या ड्रग्स तस्करांची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान ड्रग्स तस्करीमध्ये अभिनेता अरमान कोहलीचा समावेश असल्याची माहिती NCB ला मिळाली. त्यानंतर याच माहितीच्या आधारे एनसीबीने आज अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत एनसीबीला अरमानच्या घरी ड्रग्स सापडले आहे. हे ड्रग्स किती आहे ? त्याची बाजारमूल्यानुसार काय किंमत आहे ? याची माहिती मिळू शकलेली नाही.
छापेमारीसाठी रोलिंग थंडर ऑपरेशन
मागील काही दिवसांपासून NCB कडून ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. NCB ला गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वेगवेगळ्या औषधांबद्दल बरीच माहिती मिळाली. त्यानंतर NCB ने ऑपरेशन सुरू केलेले आहे. या मोहिमेला इश्का रोलिंग थंडर असे नाव देण्यात आले आहे. याच ऑपरेशन अंतर्गत अरमान कोहलीच्या घरी छापेमारी करण्यात आली. या ड्रग्स तस्करी प्रकरणात बॉलिवूड तसेच इतर क्षेत्रातील मोठी नावे सामील होण्याची शक्यता आहे. अरमानच्या घरात ड्रग्स सापडल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.