मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची ती मागणी मान्य


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 मुंबईः लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकलमुभा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनसेनंही खास ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केलं आहेसर्वसामान्यांसाठी लोकल सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं होतं. त्यात मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी तातडीने सुरू करा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कालच्या भाषणात लोकलबाबत निर्णय जाहीर केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक ट्वीट केलं आहे. 'मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे,' असं खास ट्वीट मनसेनं केलं आहे.



Post a Comment

Previous Post Next Post