आजी व माजी आदर्श सरपंचांना समाजसेवा ग्रामरत्न पुरस्कार वैशाली सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मुंबईतील हॉटेल हॉलिडे ईन येथे सोहळा

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई/प्रतिनिधी

      सदगुरु प्रेझेंटेशन द्वारा कॉटन सिटी एक्सलन्स अवार्ड २०२१ फिल्म फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने संचालक प्रशांत मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिनेमा, चित्रपट निर्मिती सह साहित्य, सहकार, पत्रकार, ग्रामविकास क्षेत्रातील विविध व्यक्तींचा मुंबईतील हॉटेल हॉलिडे येथे विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला.यामध्ये अमरावती

भंडारा, व अकोला जिल्ह्यातील आजी व माजी आदर्श सरपंचांचा देखील समावेश होता.अमरावती तालुक्यातील सावर्डी येथील आदर्श माजी सरपंच राहुल उके  तसेच खिरगव्हाण येथील सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांना सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत वअभिनेता मिलिंद दास्ताने यांचे हस्ते समाजसेवा ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       कसबेगव्हाण येथील आदर्श सरपंच शशिकांत मंगळे यांना सहकार ग्रामरत्न जिवण गौरव पुरस्काराने, दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील माजी आदर्श सरपंच सतिश साखरे यांना सहकार रत्न व कळमगव्हाण येथील उपसरपंच कपील देवके यांना सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील धाकली येथील युवा आदर्श सरपंच महेंद्र पाटील गाढवे यांना  ग्रामसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील हरदोली झंजाडा येथील आदर्श सरपंच सदाशिव ढेंगे यांनी ग्रामसेवा रत्न व संगमनेर तालुक्यातील कसारे येथील सरपंच माझा चे संचालक रामनाथ बोऱ्हाडे यांना पत्रकार क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

      यावेळी सामाजिक, राजकीय पत्रकारिता तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. सर्व पुरस्कृत मंडळींचे सरपंच सेवा महासंघाच्या वतीने स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post