प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : रविवारी दि:- 29 ऑगस्ट 2021 रोजी पत्रकार भवन मुबंई या ठिकाणी,''मी मराठी-महाराष्ट्र गौरव'' पुरस्कार 2021 वितरण समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे उद्दघाटक :मा.विद्याताई चव्हाण (माझी आमदार) विशेष अतिथी : मा. जुई गडकरी (प्रसिध्द सिने-नाट्य अभिनेत्री ) समारंभाध्यक्ष : मा.डॉ.प्रवीण नीचत (होप फाउंडेशन अध्यक्ष ) स्वागत अध्यक्ष : मा. राज पटेकर (चित्रपट निर्माते व उधोजक) विशेष अतिथी : मा.आरती साळवी (सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त) प्रमुख उपस्थिती : *मा.संगीता गुरव (उद्योजिका ) मा.विनोद हिवाळे (संकल्प संस्था अध्यक्ष) मा.वासुदेव पाटील (समाजसेवक) मा.विशाल हिवाळे (युवा क्रांती सभेचे अध्यक्ष) मा.शमिका दळवी आत्मनिर्भर फाउंडेशन अध्यक्ष) निमंत्रक: मा.प्रकाश जाधव (हिंदवी स्वराज्य संघटना अध्यक्ष) संयोजक : मा. सुरज भोईर (हिंदवी स्वराज्य संघटना सचिव) या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरवात उपस्थिती सर्व पाहुण्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोस पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दयानंद जाधव सर व ज्येष्ठ नाटककार व पत्रकार जयंत पवार तसेच कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सचिव सुरज भोईर यांनी जयंत पवार यांना..श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी.. गिरणी ही शान होती ही मुंबई ची आई ,ही रचना सादर करून..प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि निवेदन संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी केले. कुमारी श्रुती लक्ष्मण हेंडवे या 11 वर्षीय मुलीने मायबाप या विषयावर विदर्भातील वऱ्हाडी भाषेत खूप छान प्रकारे कविता सादर केले.या कवितेला उपस्थिती पाहुणे आणि लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेतल्या समाजसेवक कलावंत- खेळाडू वकील,डॉक्टर,या व्यक्तीना त्यांनी केलेल्या कार्यक्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य म्हणून :*मा.विद्याताई चव्हाण , डॉ. प्रविण नीचत आणि मा.जुई गडकरी यांच्या हस्ते '' मी मराठी -महाराष्ट्र गौरव'' पुरस्कार 2021 गौरव चिन्ह आणि सन्मानपत्र" देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात मा.सुरज भोईर यांनी फार प्रभावशाली सूत्रसंचालन केले. विशेष सहकार्य सविता हेंडवे, नजमा शेख आणि कपिल क्षिरसागर यांचे मोलाचे योगदान लाभले.कार्यक्रमाची सांगता समारंभ आणि आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले..