प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई दि.19 - कृत्रिम अवयव आणि सहाय्यक उपकरणांमुळे अपंगत्वावर मात करण्याची क्षमता दिव्यांगजणांना लाभते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दिव्यांगजणांना सक्षम करण्यासाठी कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप आतापर्यंत लाखो दिव्यांगजणांना केले आहे. दिव्यांग जणांना सक्षम करण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. आज हिंगोलीतील सामाजिक सक्षमीकरण शिबराच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या उदघाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ना रामदास आठवले बोलत होते.मुंबईत बांद्रा येथील अलियावर जंग इन्स्टिट्यूटच्या हॉल मध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमास ना रामदास आठवले यांनी संबोधित केले.
मराठी है हमारी माय बोली
इसलीये महाराष्ट्र मे है हिंगोली
नरेंद्र मोदी भर देंगे दिव्यांग जनोकी झोली
दिव्यांग जानोको न्याय देगी संसद हेमंत पाटील की बोली!
अशी शीघ्रकविता ना.रामदास आठवले यांनी यावेळी सादर केली.
या कार्यक्रमात हिंगोलीतील 3 हजार 260 ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजणांना 2 कोटी 75 लाख रुपयांच्या विविध सहाय्यक उपकरणांचे वाटप आज करण्यात आले.यावेंळी खासदार हेमंत पाटील; जिल्हा अधिकारी जितेंद्र पापालकर आदी उपस्थित होते.
कृत्रिम अवयव लावल्यानंतर अनेक दिव्यांग जण आपल्या असहाय्यतेवर मात करतो. दिव्यांगजन आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तसेच दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.