प्रेस मीडिया वृत्तसेवा : धनंजय हलकर
मल्लेवाडी ता. मिरज येथे राष्ट्रवादी काँ ग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या शुभहस्ते व बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ व जिल्हा नियोजन जनसमितीवर मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर याची निवड झालेबद्दल सत्कर करण्यात आला. मल्लेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक हाती सत्ता आहे सहा महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत अकरा शून्य असा विजय मिळवत संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख मिळवली होती या सर्व विजयी उमेदवार व पॅनेलप्रमुख यांचे कौतुक यावेळी मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी केले मल्लेवाडी तील गणेश नगर येथील दहा लाख रुपये गटारी चे काम तर तीन लाख रुपये शाळा खोल्या दुरुस्ती यांच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना मनोज शिंदे-म्हैसाळकर म्हणाले की मल्लेवाडी करांनी दाखवुन दिले आहे की संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची जनता मल्लेवाडीत असून येणा-या कालावधीत मल्लेवाडीस जिल्हा नियोजन समिती व इतर माध्यमातून निधीची कमतरता भासू देणार नाही. जनतेच्या कामांची दखल घेवुन पुर्णत्वास नेवु तसेच यावेळी या ग्रामपंचायतीच्या निकालावरून बाळासाहेब व राष्ट्रवादीवर जनतेचे असलेले प्रेम दिसून येत आहे गतवेळी थोड्याफार प्रमाणे हुकलेली संधी पुढील वेळी आपण जनतेच्या मनातील आमदार हे आपल्या मल्लेवाडी चे आमदार बनवण्याची आत्ता प्रयत्न करायला हवेत हि जबाबदारी असल्याची प्रतिक्रीया दिली.यायवेळी
जिल्हा बॅकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे यांनी मल्लेवाडी हे गाव पूर्णपणे राजकारण विरहित असून निवडणुकांनंतर सर्व एक दिलाने गावच्या विकासासाठी काम करत असल्याचे सांगितले आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा बँकेचे संचालक बनवून जयंत पाटील साहेबांनी मोठी जबाबदारी दिली साहेबांसोबत काम करणे आमचे भाग्य आम्ही समजतो असाच आशीर्वाद मल्लेवाडी च्या विकासासाठी लाभावा असे मत व्यक्त केले . यावेळी आप्पासाहेब हुळ्ळे, वास्कर आप्पा शिंदे, मल्लेवाडी सरपंच विनायक पाटील, उपसरपंच वर्षा भोसले, पोलीस पाटील अभय शिंदे मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तानाजी दळवी शिवाजी महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. रावसाहेब दरूरे, विश्वास पाटील, देवजी साळुंखे, पृथ्वीराज सावंत , प्रकाश क्षिरसागर,खुदबुद्दिन कमानदार संजय सावंत,राजू भोसले, अमोल शिंदे, जयशिंग पाटील आदी मान्यवर सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.