मिरज :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सांगली जिल्ह्यात शिवसैनिकांची तीव्र आंदोलन सुरू





धनंजय हलकर (शिंदे)

मिरजेत आज शिवसेनेच्या वतीने महाराणा प्रताप चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत नारायण राणे यांचे पोस्टर फाडत पोस्टर ला जोड्याने मारले,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी मिरजेत शिवसेना चांगलीच आक्रमक झाली, नारायण राणे यांना मिरजेसह सांगली जिल्ह्यात पाय न ठेऊ देण्याचा इशारा देण्यात आला होता, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या  सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,मंत्री नारायण राणे यांचे पोस्टर फाडत त्यावर जोड्याने मारत असताना ते जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडविले त्यावेळी  शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली  : राणेंच्या प्रतीकात्मक पुतळा दहन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पुतळा काढून घेतला  यावेळी संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली  

शिवसेना तालुका प्रमुख

संजय काटे,मिरज शहरप्रमुख शिवसेना विजयराव शिंदे, मिरज शहर संघटक किरणसिंग राजपूत, मिरज तालुका प्रमुख विशालसिंग राजपूत, मिरज शहर महिला आघाडी नदाफमॅडम, गजानन मोरे अमोल रणदिवे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post