इचलकंरजी प्रतिनिधि श्रीकांत कांबळे.
*गांधीनगर येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून शाळा विस्तार निधीच्या नावाखाली सक्तीची वसुली वृत्ताचे ऑल इंडिया ह्युमन राईट ने घेतली दखल. गांधीनगर वळीवडे तालुका करवीर येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून शाळा विस्तार निधीच्या नावाखाली शाळेचा दाखला देण्यासाठी तीनशे रुपयाची सक्तीची वसुली केली जात आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे याची दखल शिक्षणाधिकारी शिक्षण संचालक व शिक्षणमंत्र्यांनी घेऊन सोक्षमोक्ष करावा अन्यथा या विरोधात उपोषण, निदर्शने करावे लागतील असे ऑल इंडिया ह्युमन राईटचे प्राध्यापक सचिन हळदकर यांनी प्रेस मीडियाशी बाेलताना व्यक्त केले. यावेळी ऑल इंडिया ह्यूमन राईटचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख दत्ता मांजरे, हुपरी चे फिरोज गुडूभाई, सामाजिक कार्यकर्ते नागेश क्याडगी, किरण सुभेदार, तसेच इचलकरंजी नगरपालिकेचे माजी सभापती नरेश नगरकर आदी उपस्थित होते.