शाळा आणि कॉलेज सुरू करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल... आरोग्यमंत्री राजेश टोपे

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

शाळा आणि कॉलेजसंदर्भात शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभाग निर्णय घेणार आहे. यासंदर्भात संबंधित मंत्री उदय सामंत तसेच वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत टास्क फोर्सचे अहवाल येतील.त्यानंतर संबंधित विभाग चर्चा करतील आणि निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

शाळा कधी सुरू होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असतानाच याबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले, शाळा आणि कॉलेज सुरू करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरूंच्या संपर्कात आहे. कुलगुरू त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवतील. शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची चर्चा होऊन शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.

लसीकरण यंत्रणा सक्षम

राज्यातील लसीकरण यंत्रणा सक्षम आहे. आपण 14 ऑगस्टला लसीकरण केले. त्यामुळे आपण मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करू शकतो, असे राजेश टोपे म्हणाले.

दोन डोस घेतले तरी कोरोनाचा धोका!

लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, असे समजू नये. संसर्ग होऊ शकतो. संसर्गाची परिणामकारकता लसीमुळे कमी होऊ शकते. लसीमुळे त्या व्यक्तींना आयसीयूची गरज लागणार नाही. ऑक्सिजनची गरज लागणार नाही. अमेरिका आणि इतर देशांमध्ये लसीकरण झालेय त्या ठिकाणी संसर्ग मोठय़ा प्रमाणात होत असला तरी मृत्यूदर कमी झालेला दिसतो. त्यामुळे नागरिकांनी कोरोना लस घेतली असली तरी सतर्कता बाळगण्याची गरज आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

मंदिरे उघडण्याची घाई नको

राज्यात आणि देशात कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्याची घाई नको. आपण वेट आणि वॉच करत आहोत. मंदिरे सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

डेल्टाची लक्षणे सौम्य, डेल्टा प्लसमुळे अधिक संक्रमण

सात जिह्यांमध्ये कोरोना संख्या जरी वाढली असली तरी काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. या जिह्यांत अधिकाधिक लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे जरी संक्रमण होत असले तरी त्याची लक्षणं सौम्य आहेत, मात्र डेल्टा प्लस वेरिएंटमध्ये संक्रमण अधिक करण्याची क्षमता असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post