प्रेस मीडिया वृत्तसेवा :
गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी रुई-चंदूर रोड या परिसरातील *शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली*. या भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरांतील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व ठिकाणच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
यावेळी जि.प.स. वंदना मगदूम, सरपंच करिश्मा मुजावर, उपसरपंच युनुस मकानदार, जवाहर संचालक अभय काश्मीरे, जवाहर शेती अधिकारी किरण कांबळे, अर्जुन मुजावर, पदमांना हेरवाडे, पत्रकार भाऊसाहेब फास्के, संजय मगदूम, रावसाहेब अब्दान, सदाशिव पोवार, सुभाष चौगुले, जीवंदर बलवान, रामचंद्र काश्मीरे, केरबा पुजारी, रोहित पाटील, अश्विज देसाई, विष्णू सावंत, संतोष पोवार, इम्रान मुजावर, राजू कांबळे, अरविंद हुपरे, सागर मुरचूटे , चंद्रकांत अप्राध, सुशांत आंबी यांच्यासह पूरग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.