प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सध्या बाजारपेठांमध्ये राख्यांसह विविध भेटवस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखी यंदा महागाईच्या फेऱ्यात अडकली आहे. गतवर्षी 10 ते 15 रुपयांना असणारी राखी यंदा 20 ते 25 रुपयांना मिळत आहे. सध्या बाजारपेठेत लायटिंगच्या राख्यांची क्रेझ आहे. याशिवाय रेशीम धागे व चंदन राख्या, मोती, रुद्राक्ष यासारख्या राख्यांचे असंख्य प्रकार बाजारात दिसून येत आहेत.
वालचंदनगर धील सराफा बाजारातही चांदी आणि सोन्याच्या मुलामा दिलेल्या राख्या उपलब्ध आहेत. वालचंदनगर शहरात बहीण आपल्या लाडक्या भावासाठी सुंदर व आकर्षक राखी खरेदी करताना दिसत आहे. भारतीय डाक विभागाच्या वतीन राखी विशेष अशी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
बहिण भावाच्या अतूट नात्यांचा रेशमी धाग्यांनी जोडणार सण म्हणजे रक्षाबंधनसध्या ब्रेसलेटसारख्या राख्यांना बाजारात मोठी मागणी आहे. 10 ते 15 रुपयांपर्यंत असणाऱ्या राख्या आता 20 ते 25 रुपयांवर पोहोचल्या आहेत. सध्या बाजारात आलेल्या राख्या गुजरात आणि सुरत येथून उपलब्ध झाल्या आहेत.
ऑनलाइन राख्या व गिफ्ट खरेदीला युवा ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी महिनाभर आधीपासून बाजारपेठेतील दुकाने पालथी घालून लाडक्या भावासाठी बहीण मनासारखी राखी मिळेपर्यंत पायपीट करत असे.
ऑनलाइन बाजारपेठही व्यापक
आता ऑनलाइनच्या जमान्यातील वालचंदनगर बाजारपेठही व्यापक झाली आहे. खडे, मोती, गोंडा, रेशीम धागा, प्लॅस्टिकची फुले, मॉडर्न डिझाइन आणि लुक असलेल्या असंख्य राख्या ऑनलाइन बाजारपेठेत उपलब्ध आहेत.