प्रेस मीडिया वृत्तसेवा :
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने देशातील १५२ पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्या १५२ अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली. १५२ अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांचा समावेश आहे. त्यांची उत्कृष्ट तपास अधिकारी या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
डाॅ. प्रीती टिपरे या सोलापूर पोलीस आयुक्तालयात मागील दोन वर्षांपासून सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग २ पदावर कार्यरत आहेत,अनेक गुन्हे उकल करण्यात त्यांनी यशस्वी भूमिका बजावली आहे.