केंद्र सरकारने अमेरिकेच्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या लसीला शनिवारी आपत्कालीन मंजुरी दिली



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 केंद्र सरकारने अमेरिकेच्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या लसीला शनिवारी आपत्कालीन मंजुरी दिली. देशाला मिळालेली ही पहिली सिंगल डोसवाली कोरोना प्रतिबंधक लस असून कोरोनाची गंभीर लक्षणे रोखण्यात 85 टक्के प्रभावी आहे. पुढील काही दिवसांतच ही लस बाजारात येईल.

जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या या लसीमुळे देशात आपत्कालीन मंजुरी मिळवणाऱ्यां लसींची एपूण संख्या पाच झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी सोशल मीडियातून या लसीची खूशखबर दिली. आपत्कालीन मंजुरीसाठी जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने शुक्रवारी ड्रग पंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) अर्ज केला होता.पंपनीचा अर्ज डीसीजीआयने एक दिवसाच्या आत मंजूर केला. या मंजुरीमुळे कोरोनाविरोधातील लढा भक्कम होईल. सरकार सध्या कोरोना लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मांडविया यांनी सांगितले. सरकारने नामांकित लस उत्पादक  कंपन्यांना चाचणीमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सनव्यतिरिक्त कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पूटनिक-व्ही आणि मॉर्डनाची लस उपलब्ध आहे.

59 देशांमध्ये वापर

हिंदुस्थानात या लसीचे उत्पादन करण्यासाठी जॉन्सन अॅण्ड जॉन्सन पंपनीने हैदराबादच्या बायोलॉजिकल ई पंपनीशी करार केला आहे. या लसीला जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्लूएचओ) मंजुरी दिली असून सध्या एपूण 59 देशांमध्ये या लसीचा वापर केला जात आहे.

लसीची वैशिष्टय़े

  • कोरोनाची गंभीर लक्षणे रोखण्यात ही लस 85 टक्के प्रभावी आहे. रुग्णालयात दाखल होण्याइतपत संसर्गाचा धोका वाढत नाही.
  • चाचण्यांमध्ये ही लस कोरोनाचा संसर्ग रोखण्यात 66 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाली आहे.
  • कोव्हिशिल्डप्रमाणेच ही व्हायरल व्हेक्टर लस आहे.
  • जॉन्सन अॅण्ड जॉन्सन पंपनीने कोरोना विषाणूपासून जीन घेऊन ह्यूमन सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी एडीनोवायरसचा वापर केला आहे. त्यानंतर सेल प्रोटीन्स बनवतो. या प्रोटीनची विषाणूविरुद्ध लढण्यासाठी मोठी मदत होते, प्रतिकारशक्ती वाढते.
  • एडीनोवायरसचे काम लसीला थंड ठेवण्याचे आहे. पंपनीने अशा फॉर्म्युलाचा वापर केला आहे, ज्यामुळे लसीला फ्रीज करण्याची गरज नाही.

Post a Comment

Previous Post Next Post