नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱया पाच बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखा युनीट-6च्या पथकाने गजाआड केले.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 शिवाजी नगर येथील झोपडपट्टी परिसरात क्लिनिक थाटून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱया पाच बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखा युनीट-6च्या पथकाने गजाआड केले. औषधांचे परिणाम, दुष्परिणाम माहीत नसतानाही पाच बोगस 'doctor' रुग्णांना वाटेल ती औषधं देत होते.शिवाजी नगर येथील गजबजलेल्या परिसरात काही बोगस डॉक्टर क्लिनिक थाटून नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याची खबर पोलीस निरीक्षक हनमंतराव ननावरे यांना मिळाली. 

त्यानुसार यांची गंभीर दखल घेत प्रभारी निरीक्षक रवींद्र सांळुखे यांच्या नेतृत्वाखाली ननावरे, एपीआय गायकवाड, तोरसकर, गावडे, अर्चना कुदळे, मीरा देशमुख व पथकाने पालिकेच्या एम वॉर्ड पूर्व येथील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या पथकाची मदत घेऊन क्षमा, अलिशा, आसिफा, रेहमत, मिश्रा या पाच बोगस डॉक्टरांच्या क्लिनिकवर छापा टाकला. त्या वेळी बोगस डॉक्टर नागरिकांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करताना रंगेहाथ सापडले. मोहम्मद शफी आलम (53), काशीद खान (51), मेहताब अहमद हसन (48), नागेंद्र मिश्रा (48), याकुबदार इद्रिसी (43) या बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post