प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई -अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वादग्रस्त पती राज कुंद्रा याला पोलिसांनी अटक केली होती. अश्लील चित्रपटांच्या निर्मितीच्या व्यवसायात गुंतला असल्याच्या आरोपाखाली त्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. सध्या जेलमध्ये आहे. करण्यात आली आहे. या प्रकरणात अगोदरच चार जणांना अटक झाली होती.राज कुंद्राच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महाराष्ट्र सायबर सेलमधील सुत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोपडा आणि मॉडेल पूनम पांडे यांचंही नाव आरोपी म्हणून समोर आलं होतं.
या दोघांचाही जबाब महाराष्ट्र सायबर सेलनं नोंदवून घेतला आहे. दोघिंनीही राज कुंद्रा विरोधात आरोप केल्याचीही माहिती समोर आली आहे.तर आता अभिनेत्री शर्लिन चोपडाने सोशलवर एक फोटो शेअर केला आहे. या मध्ये राज कुंद्रा सह इतर सर्व जन दिसत आहे. तिने फोटो ला कॅप्शन दिले आहे. की,'हा 29 मार्च 2019 चा दिवस होता. आम्स्प्राईमद्वारे आयोजित 'द शर्लिन चोपड़ा' अॅपच्या पहिल्या कंटेट शूटला सुरुवात होत होती. माझ्यासाठी हा नवा अनुभव होता. कारण मी कोणत्याही अॅपसाठी पहिल्यांदाच असं शूट करत होते. उत्साह आणि जोशपूर्ण वातावरण होतं', असं शर्लिन चोप्राने हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे. दरम्यान, हा फोटो शेअर करताना, शर्लिनने राज कुंद्रांवर जे आरोप केले आहेत, त्याला दुजोरा देण्याचा हा प्रयत्न असावा अशी चर्चा सध्या सोशलवर होत आहे.