कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या विकासकामांविषयी मंत्रालय स्तरावर बैठकीच आयोजन करण्यात येणार... राजेश क्षीरसागर



 राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कोल्हापूर, ७ ऑगस्ट - कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या योजनेच्या अंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, भुयारी गटार, पादचारी मार्ग या कामांसाठी १७८ कोटी ९७ लाख रुपयांचा सविस्तर अहवाल प्रकल्प सादर करण्यात आला आहे. यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा चालू असून त्याला संमती देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. याविषयी या आठवड्यात कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या विकासकामांविषयी मंत्रालय स्तरावर बैठकीच आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post