ब्रेकिंग न्यूज : सांगली जिल्ह्यातील *अंकली* व कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावांमध्ये आशंका फाऊंडेशनने पाखरेजी चॅरिटेबल ट्रस्ट खिद्रापूरच्या सहकार्याने जीवण्याश्यक वस्तूंचे एकूण १५० किट वाटप करण्यात आले.







प्रेस मीडिया वृत्तसेवा :  खिद्रापूर / प्रतिनिधी


जुलै २०२१ मध्ये  कोल्हापूर , सांगली , जिल्ह्यात महापुरामुळे पूरग्रस्त भागातील लोकांच प्रचंड नुकसान झालं. महापुरामुळे शेतीचे , कुटूंबातील प्रापंचिक नुकसान झाले ,ही बाब लक्षात घेता मुंबईतील आशंका फाऊंडेशन च्या वतीने पूरग्रस्त सांगली जिल्ह्यातील *अंकली* व कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावांमध्ये आशंका फाऊंडेशनने पाखरेजी  चॅरिटेबल ट्रस्ट खिद्रापूरच्या  सहकार्याने जीवण्याश्यक वस्तूंचे एकूण १५० किट वाटप करण्यात आले. ह्या मदतीच्या कर्तव्याला अनेक मदतीचे हात धावून आले त्यामध्ये डिसीमाल , द ब्रेकफास्ट  रिओलुशन ,ब्राईट फुचर व्ही पी मल्टिमिडीया आणि सर्व्हिसेस , ,मुबंई अमृततुल्य , श्रावस्ती बुद्ध विहार सेवा संघ, श्रावस्ती महिला संघ ( वरळी डेअरी ) तसेच स्पायरल वेव्ह व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, कैलासचंद्रआर्या यासांरख्या लोकांनी तसेच संस्थानी ही मदत आर्थिक व वस्तू स्वरूपात आशंका फाऊंडेशन यांच्याकडे जमा केली . 

       आशंका फाऊंडेशन चे संस्थापक आनंद खंकाळ , संस्थेचे अध्यक्ष विनय कोळी , संस्थेचे सचिव अक्षय गायकवाड , खजिनदार संकेत जावळे व सभासद संजय साळुंके, विजय भोसले , निलेश चव्हाण , प्रेम हिरवे , अमर जावळे, जयेश गायकवाड ,अमन कडाळे

    तसेच मुंबई विद्यापीठातील मास्टर ऑफ सोशल वर्क चे विद्यार्थी शुभम पाठक ,श्रावणी किर ,अनुज पोटे,दिपाली माने, भवांजी कांबळे ,शशांक सोनवणे, अश्विनी हिवाळे हे विद्यार्थी तसेच पाखरे-जी चॅरिटेबल ट्रस्ट, खिद्रापूरचे संस्थापक अध्यक्ष- गणेश पाखरे, संचालक सुखदेव पाखरे, गीता पाखरे, ओंकार पाखरे, राजू पाखरे, दिपाली पाखरे, अमृता पाटील, श्रीहरी कोळी, शुभम पाटील राजू सनदी, जावेद मुल्लानी, विकी पाखरे .हे सर्व युथ  हे  मदत न समजून आपले कर्तव्य समजून हे कार्य केलेले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post