प्रेस मीडिया वृत्तसेवा :
जयसिंगपूर शहरातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व म्युझियम साठीची जागा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपरिषदेला विनामोबदला मिळवून दिल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा कुरुंदवाड मराठा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी कुरुंदवाड येथील मराठा मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष
श्री. महिपती बाबर विद्यमान उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, संचालक महादेव गुंडू शिंदे (मेजर) सचिन कृष्णा भोसले, विष्णू महादेव बाबर, कृष्णा गोपाळ नरके, सुरेश कृष्णा चोपडे, भिमराव दत्तात्रय यादव, गजानन शामराव पाटील, मोरेश्वर बाबर तसेच मराठा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. धनपाल आण्णा आलासे उपस्थित होते.
यावेळी महिपती बाबर यांनी राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे आभार व्यक्त करताना शिवप्रेमी जनतेसाठी आपल्या माध्यमातून मोठे काम झाले असल्याचे सांगताना शिवप्रेमी जनते बरोबरच तमाम मराठा समाज बांधवांच्या वतीने आम्ही आपले अभिनंदन करीत असल्याचे सांगितले..