शिरोळ तालुका मराठा मंडळाच्या वतीने राज्यमंत्री यड्रावकर यांचा सत्कार

 




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

जयसिंगपूर-

जयसिंगपूर शहरातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व म्युझियम साठीची जागा राज्य सरकारच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपरिषदेला मोफत मिळवून दिल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा शिरोळ तालुका मराठा मंडळाच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला,

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजाबरोबरच सर्व जाती-धर्माचे श्रद्धास्थान आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर शहरात पुतळा उभारला जावा अशी सर्वांची भावना होती मंत्रीपदाची ताकत वापरत आपल्या हातून हे मोठे काम झाले आहे आपणच पुढाकार घेऊन यापुढच्या काळात प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि वस्तुसंग्रहालयाचे काम करावे आणि ते आपण करू शकता असे  उदगार भरत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन पैलवान विठ्ठल मोरे यांनी यावेळी काढले 

आपण केलेल्या या मोठ्या कामाबद्दल  शिरोळ तालुका मराठा समाज मंडळाच्या वतीने समस्त मराठा समाज व शिवप्रेमी इतर सर्व समाजाच्या वतीने आम्ही आपले अभिनंदन करीत आहोत असेही पैलवान विठ्ठल मोरे यावेळी म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाला साजेसे तसेच पुतळा व वस्तुसंग्रहालयाचे काम केले जाईल असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी उपस्थितांना सांगितले आणि विनामोबदला जागा मिळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ व महाविकास आघाडी सरकारने मोठी मदत केली असल्याचेही सांगितले, यावेळी श्रीकांत नलवडे, नगरसेवक बजरंग खामकर, चंद्रकांत जाधव- घुणकीकर, माजी नगरसेवक अशोक घोरपडे, शंकर नाळे, रणजीत महाडिक, तानाजी जाधव- घुणकीकर,पत्रकार अजित पवार, अनंत चौगुले, सतीश जाधव, शिवाजी सावंत, माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, बाळासाहेब वगरे,गुलाब शेख यांच्यासह मराठा समाज बांधवांसह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post