ठाकरे सरकारला घरचा आहेर



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 जालना :  मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असताना आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या पेटताना दिसत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारला घेरलं आहे. त्यातच आता ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मागासवर्गिय कल्याणमंत्री विजय वडट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. जालन्यातील एका सामाजिक मेळाव्यात विजय वडेट्टीवर बोलत होते.

सत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कपबश्या धुणारे! चहा पिणारे नाही. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्ही खावा भजा! अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजावर खूश? तुम्ही आम्ही कुठे आहोत, याचा विचार आपण करत नाही, असं वक्तव्य विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post