कली युगातिल आई पोटाच्या एक वर्षाच्या मुलाला करत होती बेदम मारहान , अखेर ती निर्दयी आई सापडली.



  अनवरअली नजीर शेख : 

कली युगातिल आई पोटाच्या एक वर्षाच्या मुलाला करत होती बेदम मारहान , अखेर ती निर्दयी आई सापडली.

अनैतिक संबंधांबाबत पतीसोबत वाद झाल्यानंतर या महिलेने आपल्या एक वर्षाच्या बाळाला मारहाण केली होती. तिने या सर्व प्रकाराचा व्हिडीओही  तयार केला होता. त्या निर्दयी आईचा आता शोध लागला आहे.अखेर ती निर्दयी आई सापडली, बाळाला लाथा-बुक्क्यांनी केली होती मारहान , पती-पत्नी मधील वादामुळे कित्येक वेळा त्यांच्या लहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 

तमिळनाडू मधील एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तुलसी असं या महिलेचं नाव होतं. अनैतिक संबंधांबाबत पतीसोबत वाद झाल्यानंतर तिने चक्क आपल्या एक वर्षाच्या बाळाला मारहाण केली होती. तिने या सर्व प्रकाराचा व्हिडीओ ही तयार केला होता. या व्हिडीओमध्ये आपल्या रडणाऱ्या बाळाकडे पाहून ती चक्क हसताना दिसत होती. आता या महिलेचा शोध लागला आहे.

आंध्र प्रदेशातील सिंधूर गावात राहणाऱ्या तुलसीचे तमिळनाडू मधील जिंजी जिल्ह्यात राहणाऱ्या वाडीवाळगन सोबत 2016 मध्ये लग्न झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून कामाच्या निमित्ताने वाडीवाळगन चेन्नईमध्ये राहत होता. तर तुलसी जिंजी जिल्ह्यातील मेत्तुर गावात राहत होती. या दोघांना प्रदीप (1) आणि गोकुळ नावाची दोन मुलं आहेत.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाडीवाळगन चेन्नईमध्ये राहत असताना तुलसीचं दुसऱ्या एका व्यक्तीसोबत  सूत जुळलं होतं. याची माहिती मिळाल्यानंतर वाडीवाळगनने तिला या व्यक्तीसोबत बोलण्यास मज्जावही केला होता. यावरुन त्यांच्यात वादही झाले होते. या सगळ्यात तीन महिन्यांपूर्वी तुलसीने एक वर्षांच्या प्रदीपला अमानुष मारहाण केली होती. या प्रकाराचा व्हिडीओही तिने तयार केला होता.

तुलसी प्रदीपच्या तोंडावर चक्क बुक्के मारताना दिसत आहे. ते बाळ मोठ्याने रडत असूनही तुलसी पुढे त्याला लाथही मारते. एवढं सगळं करुन वर ती बाळाकडे बघून हसत होती. पूर्ण व्हिडीओमध्ये एक वर्षाचं बाळ वेदनेने रडत असूनही, तुलसीला त्याचं काहीच वाटत नाही. हा धक्कादायक व्हिडीओ  पाहिल्यानंतर वाडीवाळगनने तुलसीला याचा जाब विचारला. मात्र, यावर काहीही स्पष्टीकरण न देता, ती थेट आपल्या माहेरी निघून गेली.

यानंतर वाडीवागळनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून केवळ तमिळनाडूच नाही, तर देशभरातील लोकांना धक्का बसला आहे. अनेकांकडून हा व्हिडीओ शेअरही केला जात आहे. दरम्यान, ही दोन्ही मुलं सध्या वाडीवागळनसोबत सुरक्षित आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या निर्दयी आईचा आता शोध लागला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post