राज्यातील मंदिरे खुली करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.ऑल इंडिया ह्युमन राईट सह विविध संघटनेच्या वतीने निवेदन.

 





इचलकंरजी प्रतिनिधी श्रीकांत कांबळे :

 काेराेना संसर्गामुुळे गेली दाेन वर्ष झाले महाराष्ट्रतील मंदिर बंद आहेत.त्यावर उपजीविका करणारे अनेक व्यवसायिक याचे व्यवसाय ठप्प झाले असुन त्याच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे आम्हा नागरिकना आमचे पारंपरिक रितीरिवाज प्रमाणे श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक या महिन्यावर सणवार उत्साहने साजरे करणे व मंदिरात जाऊन पुजाआर्चा करणे,देवदर्शन घेणे दुरापास्त झाले आहे वरील मंदिरे बंद असल्यामुळे चारचाकी वाहनांना देवदर्शन घडवण्यासाठी काेणत्याही तर्हेचे भाडे नसल्याने त्याचा व्यवसाय बंद स्थितित असुन त्याच्या कर्जाचे हफ्ते भरणे अशक्य व अडचणीचे बनले आहे.

 त्यामुळे या वाहनाची पसिंग्ज, इनशुरन्स विमा इ. याचे हफ्ते भरण्यासह रिन्यु करुन घेण्यास  शासनाकडुन पाच वर्षाची मुदत वाढ मिळावी. अलीकडेच महाराष्ट्रतील परमिट रुम, बीअर बार असे सर्व व्यवसाय चालु करण्यास शासनाकडुन परवानगी मिळाली आहे मात्र राज्यातील मंदिरे उघडण्यास शासनाकडुन परवानगी का मिळत नाही..? हे जनतेला काेडे पडलेले आहे तेव्हा मंदिरातील पुजारी व अनुषंगीक धाेटे व्यावसायिक यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न गंभीर हाेत चाललेला आहे विचारात घेवुन राज्यातील मंदिरे खुली करावेत अन्यथा तीव्र आंदोलन  करण्यात येईल.याबाबतचे निवेदन इचलकंरजी उपविभागीय अाधिकारी याना देण्यात आले यावेळी ऑल इंडिया ह्युमन राईटचे काेल्हापुर जिल्हा प्रमुख दत्ता मांजरे तारदाळकर,  गजानन शिरगावे,  सुनिल पुजारी, दस्तगीर बागवान,लालचंद्र पारीख,त्रिंबक ऊर्फ नाना दातार, संजय तिप्पे,गुरुप्रसाद आरभावे नागेश कैदगी,व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post