इचलकंरजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे:
तारदाळ ता. हातकणंगले येथे भारत निर्माण नळ पाणीपुरवठा येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला.
दर वर्षी प्रमाणे भारत निर्माण नळ पाणीपुरवठा महिला कर्मचारी यांच्या वतीने रक्षाबंधन चा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थिती माणुसकी फाउंडेशनचे प्रविणभाऊ केर्ले,भारत निर्माणचे माजी अध्यक्ष विजय जाधव व सचिव सचिन पवार प्रमुख उपस्थिती होते
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये सदैव कामगाराच्या पाठीशी खंबीरपणे राहू असे सांगितले या वेळी स्वाती केर्ले, प्रतिभा पाटील,पूनम संगपाळ,वंदना मिरजे,अनिता भुयेकर,दिलशाद देसाई,शोभा भगत,भारती चव्हाण,निलेश पोवार,वैभव आवळे,अजित कोरवी,अजित कोळी,अक्षय चॊगले, शिवाजी पोवार,मधुकर खांडेकर सर्व कर्मचारी उपस्थित होते.