प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त मुख्य ध्वजा रोहण समारंभ राजाराममैदान येथे साजरा करणेत येतो. तथापि गतवर्षी प्रमाणेच यावर्षीही इचलकरंजी शहरामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तसेच शासन परिपत्रकानुसार कोरोना विषाणू संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्य दिन कार्यक्रम आयोजित करणेत मर्यादा येणार आहेत. हि वस्तुस्थिती व सावधगिरीच्या उपाय योजना विचारात घेता यावर्षीसुद्धा स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करणेबाबतचे निर्देश शासन स्तरावरुन देणेत आलेले आहेत.
या अनुषंगाने नगरपरिषदेच्या मुख्य ध्वजारोहण समारंभा साठी दरवर्षी राजाराम मैदान येथे होणारी नागरिकांची त्याच प्रमाणें विद्यार्थ्यांची गर्दी टाळून यावर्षीही १५ ऑगस्ट रोजीचा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्तचा मुख्य ध्वजारोहण समारंभ नगराध्यक्षा सौ.अलका अशोक स्वामी यांच्या हस्ते नगर परिषद मुख्य इमारतीच्या प्रांगणात कोव्हिड- १९ च्या सर्व नियमांचे पालन करून पदाधिकारी आणि अधिकारी- कर्मचारी यांच्या उपस्थितीत करणेत येणार आहे*.