प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी शहर परिसरातील मतिमंद मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या सन्मती मतिमंद विकास केंद्रसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका कै. सौ. सुलभा कुबेर मगदूम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने ' माई... एक दीपस्तंभ 'या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, आमदार प्रकाश आण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ राहूल आवाडे साहेब* यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी छायाचित्रात डॉ. कुबेर मगदूम डॉ. विजय व विनय मगदूम, डॉ. चैताली मगदूम,मधुकर मणेरे, सौ. किशोरीताई आवाडे, स्वप्नीलदादा आवाडे, अतुल मणेरे,संजय खूळ व सुहास माळी इतर मान्यवर उपस्थित होते.