प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता. २७ प्रबोधन वाचनालयाचे अध्यक्ष आणि समाजवादी प्रबोधिनीचे खजिनदार ज्येष्ठ नगरसेवक शशांक बावचकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या चिटणीसपदी निवड झाली.याबद्दल त्यांचा समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.तसेच या निवडीबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, शशांक बावचकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची मूल्ये,भारतीय संविधानाचे तत्वज्ञान यावर आधारित काँग्रेस पक्षाची विचारधारा अंगिकारून कार्य करणारे व नेमके राजकीय व सामाजिक भान असणारे बिनीचे कार्यकर्ते आहेत.तसेच त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कालवश मल्हारपंत बावचकर यांच्यामुळे काँग्रेस व पुरोगामी विचारांचे बाळकडू त्यांना घरातूनही मिळत गेले.अशा अभ्यासू निष्ठावान कार्यकर्त्यांची निवड होणे ही आजच्या काळात अतिशय महत्त्वाची बाब आहे.याबद्दल त्यांचे समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने अभिनंदन करतांना व शुभेच्छा देतांना मनस्वी आनंद होत आहे
यावेळी सत्काराला उत्तर देतांना शशांक बावचकर यांनी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश शांतारामबापू गरुड यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्यासह सर्वांचे आभार मानले.आपल्यातील कार्यकर्ता घडविण्यात समाजवादी प्रबोधिनीचे संस्थात्मक योगदानही अधोरेखित केले.तसेच या वाटचालीत सहकार्य केलेल्या सर्वांप्रती आभार व्यक्त केले.यावेळी त्यांच्या पत्नी रमा बावचकर, कन्या प्राणिता बावचकर,प्रा.रमेश लवटे,अन्वर पटेल,पांडुरंग पिसे,दयानंद लिपारे,शिवाजी शिंदे,नंदकिशोर जोशी,प्रा.सौरभ मोरे आदींची उपस्थिती होती.