इचलकंरजी प्रतिनिधि श्रीकांत कांबळे
इचलकंरजी नगरपालिकेच्या आराेग्य विभागात आराेग्य आधिकारी व कर्मचारी वेळेत हजर नसलेमुळे नागरीकांची हेळसांड हाेत आहे या बाबतचे निवेदन ऑल इंडिया ह्युमन राईट असाेसिएशनचे काेल्हापुर जिल्हा प्रमुख दत्ता मांजरे तारदाळकर यांनी इंचलकरंजी नगरपालीकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नागरीकांकडुन तक्ररी येत असल्यामुळे व एका नागरिकाच्या कामानिमित्त आराेग्य विभागात गेल्यानंतर असे दिसुन आले कि सकाळी 11.30. वाजले तरी संभदित खात्याचे आधिकारी व कर्मचारी उपस्थितित नव्हते. वास्तविक आराेग्य आधिकारी व कर्मचारी याची कामावर हजर राहण्याची वेळ सकाळी 9.45.वाजताआहे.
तसेच इचलकरंजी नगरपालीकेमध्ये पूर्वी असलेले थम इंप्रेशन बंद असल्यामुळे आधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थिति असलेलीची वेळ समजुन येत नाही त्यामुळे संभदित खात्याचे आधिकारी व कर्मचारी गैरफायदा घेत वेळेवर उपस्थिति राहणे टाळत आहेत. तेव्हा इचलकंरजी नगरपालीकेमध्ये आधिकारी व कर्मचारी याचे हजरी दफ्तर ठेवण्यात यावे. तसेच वेळेत उपस्थितित नसलेल्या आधिकारी व कर्मचारी यांचा एक महिन्याचा पगार कपात करुन दंडात्मक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी दत्ता मांजरे तारदाळकर यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नाेंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.