डॉ.गेल ऑमव्हेट यांना इचलकरंजीत अभिवादन






प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी ता. २८ जागतिक कीर्तीच्या ज्येष्ठ समाज शास्त्रज्ञ  संशोधक,अभ्यासक ,विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ.गेल ऑमव्हेट  उर्फ शलाका पाटणकर यांच्या निधनाने सर्वांगीण शोषणविरोधी चळवळीची मोठी हानी झाली आहे.त्यांचे भारतीय समाज, संस्कृती आणि पुरोगामी व सर्वहारा वर्गाची चळवळ यामध्ये मोठे योगदान होते.इतिहास व सांस्कृतिक दृष्टीकोनाची त्यांनी केलेली फेरमांडणी सर्व वंचित चळवळीना व प्रबोधन चळवळीला  नवा आयाम व नवी दिशा देणारी आहे. समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहणे हीच डॉ.गेल ओमव्हेट यांना आदरांजली ठरेल असे मत इचलकरंजीतील डॉ. गेल ऑमव्हेट आदरांजली सभेत व्यक्त करण्यात आले. समाजवादी प्रबोधिनीमध्ये विविध राजकीय पक्ष व जनसंघटना यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ.गेल ओमव्हेट यांचे वैचारिक व चळवळीतील  कार्यकर्तृत्व आणि बाबूजी,इंदूताई,डॉ.भारत पाटणकर कुटूंबियांचे योगदान व ऋणानुबंध यांची मांडणी केली.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जयकुमार कोले होते.प्रारंभी डॉ.गेल ओमव्हेट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व उभे राहून आदरांजली वाहण्यात आली.

 या सभेत विविध वक्त्यांच्या मांडणीतून असे मत व्यक्त झाले की, डॉ.ओमव्हेट यांनी बुद्धापासून मार्क्सवादापर्यन्त आणि संतसाहित्यापासून  स्त्रीवादा पर्यन्त भारतीय व जागतिक दर्शन परंपरेची समकालीन संदर्भासह मांडणी केली. फुले,शाहू व आंबेडकर यांची विचारधारा आणि येथील सांस्कृतिक संघर्ष  यांचा गाढा व्यासंग त्यांनी केला.आणि वैश्विक पातळीवर त्याची सैद्धांतिक व चिकित्सक मांडणी केली.सभेचा समारोप सभेचे अध्यक्ष जयकुमार कोले ( स्वाभिमानी पक्ष ) यांनी केला.यावेळी शशांक बावचकर ( काँगेस आय व इचलकरंजी नगरपालिका ),कॉ.दत्ता माने ( मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  ), अहमद मुजावर (ताराराणी पक्ष ),कॉ.हणमंत लोहार ( भारतीय कम्युनिस्ट पक्ष ),भाई शिवाजी साळुंखे ( शेतकरी कामगार पक्ष ),प्रदीप भीमसेन कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ),गौस अत्तार ( जनता दल ), डी.एस.डोणे ( आंबेकडरी चळवळ मध्यवर्ती समिती ),गौतम कांबळे ( भिक्खू संघ ),प्रा.रमेश लवटे ( समाजवादी प्रबोधिनी ),बी.जी.देशमुख ( अभिजित फौंडेशन )ऍड.जयंत बलुगडे ( इचलकरंजी बार असोसिएशन ) आदींनी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post