इचलकंरजी प्रतिनिधी श्रीकांत कांबळे :
इचलकंरजी नगरपरिषदेच्या वतीने गतवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार दि.15 अॉगस्ट 2021इ.राेजी भारतीय स्वातंत्र्य दिन नविन नगरपालीकेच्या प्रागंणात साजरा करणेचे ठरविले असुन यावर्षीचा समारंभ काेराेना पाश्वभूमीवर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दि. 30 जूलै 2021.चे निर्देशानुसार शासनाने वेळाेवेळी दिलेल्या निर्देशाचे तथा सुचनाचे अनुपालन करुन करावयचा असुन समारंभास मर्यादित निमंत्रित सहभाग हाेतील.याची दक्षता घ्यावी लागणार आहे इचलकंरजी नगरपरिषदेच्या वतीने मुख्य ध्वजारोहण समारंभ नविन नगरपालीकेच्या प्रागंणात सकाळी 9.40 वाजता मा. अॉड. साै. अलका स्वामी नगराध्यक्षा इचलकंरजी नगरपरिषद इचलकंरजी याचे शुभ हस्ते हाेईल.ध्वजाराेहणानंतर राष्ट्रगीत व झेंडागीत हाेईल त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करणेत येईल. तसेच इचलकंरजी नगरपरिषदेच्या वतीने विविध ठिकाणी मान्यवराच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ आयोजन केले आहे. तेव्हा इचलकंरजी नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्षा, मा. उपनगराध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व विभाग प्रमुख व सर्व संबंधीत मान्यवर व पदाधिकारी यानी उपस्थिति राहणेचे परिपत्रक इचलकंरजी नगरपरिषदेचे मा. डॉ. प्रदीप ठेंगल यानी काढले असुन तरी आपण दि. 15.अॉगस्ट 2021च्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन निमित्त हाेणार्या ध्वजारोहण समारंभाकरिता काेराेना नियमाचे पालन करुन सहभागी हाेवुन सहकार्य करावे.