इचलकरंजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
कोल्हापूर जिल्ह्यास महापुराने थैमान घातल्यामूळे गोरगरीब जनतेचे जगनेच मुश्किल झाले आहे.त्यामूळे केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आ) कामगार आघाडिचे प्रदेश अध्यक्ष प्रदिपभाऊ कांबळे यांनी खास पुण्याहून पुरग्रस्ताना कामगार आघाडीच्या वतीने जीवना अावश्यक वस्तू पाठवुन दिल्या होत्या.त्या वस्तू हातकणगले तालूक्यातील घुणकी या गावी RPI चे प.महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर,जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्या हस्ते व कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.यावेळी प्रा.शहाजी कांबळे सर व उत्तम कांबळे(दादा) यांनी घुणकी गावातील पडझड झालेल्या घराची पाहणी केल्यानंतर गावातील लोकांनी आजून मदत मिळाली नसल्याचे सांगितल्या नंतर सरांनी व दादानी पुन्हा लवकरात लवकर पंचनामा करून मदत करण्यासाठी तहशीलदार व सबंधीत अधिकारी यांना सांगून मदत मिळवुन देऊ असे सांगीतले.व जो पर्यत तुम्हाला शासन दरबारी मदत मिळत नाही तो पर्यत न्याय हक्काच्या लढ्यासाठी आम्ही अविरत पणे तुमच्या पाठीशी राहून व वेळ प्रसंगी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून न्याय देण्यासाठी शासनास सळू कि पळू करून सोडू असे सांगीतले.*
*यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे,शहर अध्यक्ष राहुल कांबळे,मातंग आघाडी अध्यक्ष संजय लोखंडे,शहर कामगार अध्यक्ष प्रदिप मस्के,हातकणगले अध्यक्ष अविनाश अबंपकर,पन्हाळा अध्यक्ष अमर कदम,महिला आघाडी प्रमुख निर्मलाताई धनवडे,कामगार आघाडी हातकणगले अध्यक्ष बाळासो कांबळे,कामगार आघाडी पन्हाळा अध्यक्ष सरदार तिवडे, दयानंद कांबळे,राजाराम कुरणे,सुशांत खाडे,प्रकाश कांबळे याच्यासह RPI चे पदाधीकारी उपस्थित होते.हि पुण्याहून मदत कामगार आघाडीचे विजय कांबळे व विजय गायकवाड हे घेऊन आले होते.*