इचलकरंजी प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा पोलिस इचलकरंजी शहर पोलिस दल आयोजित गणेशोत्सव २०२१ सणाच्या अनुषंगाने चर्चात्मक बैठकीचे आयोजित करण्यात आले होते या बैठकीत नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) आपले मनोगत व्यक्त करताना कोरोना ,महापुराच्या संकटातून आत्ताच वस्त्रनगरी सावरली आहे.या वर्षीही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन नियमांच्या चौकटीत शहरात गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन केले.
यावेळी व्यासपिठावर कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक मा श्री शैलेश बलकवडेसो,गडहिंग्लज (इचलकरंजी )विभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक मा जयश्री* *गायकवाडसो,इचलकरंजी उप अधिक्षक मा श्री बी बी महामुनीसो,अप्पर तहसिलदार मा शरद पाटीलसो, मुख्यधिकारी मा डाॕ प्रदिप ठेंगल, तसेच इचलकरंजी शहरातील गावभाग,शिवाजी नगर,शहापुर, पोलिस स्टेशन चे व शहर वाहतुक आधिकारी शहरातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदधिकारी, गणेश भक्त मान्यवर चर्चात्मक बैठकीत उपस्थित होते*