डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य याेजनेतुन स्वत:चे घर पालिकेतर्फे सफाई कर्मचारीना मिळणार ...






इचलकंरजी प्रतिनिधी श्रीकांत कांबळे. 

इचलकंरजी नगरपालीकेत अखंड पंचवीस वर्षे सेवा केलेल्या सफाई कर्मचार्याने स्वेच्छानिव्रती घेतल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास त्या कर्मचार्यास स्वत:चे घर देण्याची खास शासकीय याेजना आहे .डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य याेजनेतुन इचलकंरजी नगरपालीकेत 143 जण त्यासाठी पात्र लाभार्थी घटक आहेत या सर्व 143जणाची स्वतंत्र यादी पालिकेने सदर याेजनेसाठी बनवली आहे आस्थापनेवरील अन्य पात्र सफाई कर्मचारी आदीनाही या योजनेचा लाभ मिळवुन दिला जाणार आहे.

 रवी रजपुते साेशल फाैंडेशन तर्फे माजी उपनगराध्यक्ष रवि रजपूते यानी या विषयांबाबत नगराध्यक्षा अॉड. अलका स्वामी आणि उपनगराध्यक्ष तानाजी पाेवार याचेकडे पाठपुरावा केला तसेच शहरातल्याा पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने ही पाठपुरावा सुरु आहे या योजनेची तातडीने अंम्मलबजावणी हाेण्यासाठी रवि रजपूते यानी प्रत्यक्ष निवेदने व शिष्टमंडळामार्फत पाठपुरावा केला आहे याबाबत सर्व संबंधीत अधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक दि. 30 ऑगस्ट राेजी नगराध्यक्षांच्या दालनात बाेलवण्यात आली आहे या प्रकल्पासाठी इचलकंरजी नगरपालीका स्वत:ची जागा देणार आहे. माेफत धरे देण्यासाठी जागेचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे येत्या 30ऑगस्टच्या बैठकीत अंतिम चर्चा करुन त्याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव नगरपालीका सभाग्रहात अाऩला जाणार आहे त्यानंतर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य याेजनेस गती दिली जाणार असल्याचे इचलकंरजी नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष तानाजी पाेवार यानी पत्रकार परिषदेत सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post