प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : सणासुदीच्या काळात आपल्या परिवारापासून लांब राहून इचलकरंजी शहर व परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव प्रयत्न करीत असणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना राखी पौर्णिमेचा आनंद मिळावा म्हणून इचलकरंजी शहर महिला दक्षता कमिटीच्या वतीने आज राखी पौर्णिमेचे औचित्य साधून इचलकरंजी पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शहरातील पोलीस ठाण्यामध्ये जाऊन महिला भगिनींनी राखी बांधली*.
*याप्रसंगी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.श्री.श्रीप्रसाद यादव,पोलीस उपनिरीक्षक मा.श्री.गणेश खराडे,शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा.श्री.प्रमोद मगर,गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा.श्री.सोमनाथ कुडवे, पोलीस उपनिरीक्षक मा.श्री.रोहन पाटील,महिला दक्षता कमिटीच्या सदस्या सौ.निर्मला मोरे,सौ.शुभांगी शिंत्रे,सौ.ललिता पुजारी,मारवाडी युवा मंच मिड टाऊन च्या अध्यक्षा सौ.किरण सोमाणी,सौ.रेणू झंवर,सौ.संगीता मुंदडा,सौ.अनुराधा धूत,सौ.अनिता जैन,सौ.अनिता कुरणे,सौ प्रणिता डाळ्या,सामाजिक कार्यकर्ते श्री.गजानन शिरगांवे तसेच माहेश्वरी संस्कृती महिला ग्रुप च्या पदाधिकारी,सदस्या व पोलीस कर्मचारी उपस्थित होते*.