इचलकरंजी. दि.११(प्रतिनिधी) :
महाराष्ट्रावर चक्रीवादळ,कोरोना महामारी आणि पुरग्रस्त अशा राष्ट्रीय आपत्तीवर संयमाने मात करणारे शिवसेना पक्षप्रमुख, *मुख्यमंत्री उध्दव ठाकरे* यांच्या *वाढदिवसानिमित्त* मुलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे. *ऑनलाईन चित्रकला स्पर्धा* घेण्यात आली. शिवसेना उपनेते तथा सातारा व सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व अल्प संख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्यावतीने प्रथमच ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा-२०२१ घेण्यात आली.
या चित्रकला स्पर्धेचे आयोजन शिक्षक सेना कोल्हापूर/सातारा जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ रैनाक, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश गायकवाड, शिक्षक सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरूण मुजुमदार, शिक्षकसेना सातारा तालुकाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी केले तर स्पर्धा प्रमुख म्हणून कलाशिक्षक जोतिराम साळी, शिवकुमार मुरतले यांनी उत्कृष्ट काम केले.
या स्पर्धेसाठी परदेशातून,परराज्यातून आणि राज्यातून अशी 1225 (एक हजार दोनशे पंचवीस) विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा चार गटामध्ये शालेयस्तरावर घेण्यात आली. ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे : *गट पहीला इयत्ता १व २री* प्रथम क्रमांक - देवयानी चंद्रकांत माळी (जळगाव), व्दितीय-दृष्टी प्रफुल्ल रणगिरी (नागपूर), तृतीय-अनघा अरूण पाटील (सातारा), *गट दुसरा इयत्ता ३री व ४थी* : प्रथम क्रमांक - सोहन नागेश हंकारे (कोल्हापूर), व्दितीय-अर्घल राजेंद्र जाधव (तासगांव-सांगली), तृतीय समृध्दी
भास्कर जाधव (रहिमतपूर-सातारा), विशेष प्राविण्य प्राप्त आयुष रामचंद्रन (सिंटरा-बहरीन).
*गट तिसरा इयत्ता ५वी ते इयत्ता ७वी* : प्रथम क्रमांक- प्रेरणा विजय पाटील (चंदगड-कोल्हापूर), व्दितीय-चिन्मय चैतन्य करवळ (कोल्हापूर),तृतीयअक्षरा संदिप कोल्हे (निगडी-पुणे), *गट चौथा इयत्ता ८वी ते १०वी* : प्रथम क्रमांक-अमेय संजय देशमाने (सातारा), व्दितीय-समृध्दी हणमंत लुबाळ (माणगांव-रायगड), तृतीयसाक्षी संभाजी पाटील (पन्हाळा-कोल्हापूर).