इचलकरंजी नगरपालिकेच्या इतिहासांत पहिल्यांदाच माेठ्या प्रमाणात कर्मचारीच्या देयकाचे वाटप





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकंरजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे 

इचलकरंजी नगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त,मयत कर्मचाऱ्यांच्या,उपदान (ग्रॅज्युईटीची रक्कम).. हक्काची रजेचा पगार..वेतन राखीव निधीतून ७,०४,९०,७९९/- रूपये इतक्या मोठ्या रक्कमेचा एका दिवसात कर्मचाऱ्यांच्या देयकांचा वाटप कर्मचाऱ्यांच्या बॅंक खातेवरती प्रदान सोहळा संपन्न झाला.

यावेळी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा.श्री.तानाजी पोवार आपले मनाेगत व्यक्त करताना इचलकंरजी नगरपालीकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेवानिवृत्त कर्मचारी ग्रैज्युईटीची रक्कम, हक्काची रजेचा पगार, इतक्या माेठ्या रक्कमेचे वाटप करण्यात आले यासाठी रवि रजपुते ,व सर्वानी केलेल्या पाठपुरावामुळे शक्य झाल्याचे व्यक्त केले तर इचलकंरजी नगरपालीकेच्या नगराध्यक्षा साै. अलका स्वामी आपले मनाेगत व्यक्त करताना सर्वाच्या पाठपुरावामुळे कर्मचारीची ग्रैज्युईटीची व हक्काची रजेचा पगार मिळाल्याचे सांगितले तर काेराेना संसर्ग काळात व महापुराच्या काळात कर्मचार्यानी उत्तमरित्या सेवा बजावल्याचे सांगितले.

सदरचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांचा वाटप प्रदान सोहळा इचलकरंजी नगरपालिकेच्या कौन्सिल सभाग्रहात सेवानिवृत्त कर्मचाऱी व कर्मचाऱ्यांच्या कुटूंबासोबत समाधानपुर्वक वातावरणात पार पडला.यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते,नगरसेवक राहुल खंजीरे, इचलकंरजी नगरपालीकेचे डॉ. प्रदीप ठेंगल यानी आपले मनाेगत व्यक्त केले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांचा वाटप सोहळ्यांस नगराध्यक्षा.सौ.अलका स्वामी.इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथापक्षप्रतोद..भा.ज.पा श्री.तानाजी पोवार, बांधकाम समिती सभापती श्री.उदयसिंह पाटील. आरोग्य समिती सभापती.श्री.संजय केंगार.पाणी पुरवठा सभापती.श्री.दिपक सुर्वे.

महिला बालकल्याण सभापती.सौ.सारिका पाटील.ज्येष्ठ नगरसेवक..श्री.राहूल खंजिरे.श्री.रविंद्र माने.श्री.प्रकाश मोरबाळे.श्री.मदन झोरे विशेषसहकार्य.मा.उपनगराध्यक्ष.श्री.रवि रजपुते.मा.बांधकाम सभापती.श्री.भाऊसो आवळे.कॉ.सदा मलाबादे. श्री.रणजित अणुसे. इचलकरंजी नगरपालिका  मुर्ख्याधिकारी.डॉ.प्रदीप ठेंगल.लेखापाल सौ.कलावतीमिसाळ कामगार अधिकारी.श्री.विजयराजापुरे.

मा.नगरअभियंता.श्री.बापुसो चौधरी.ॲड.महादेव गोरडे.मा.विद्युत अभियंता, श्री.सदानंद तिवारी.प्रमुख अधिकारी इ.न.पा..तसेच याप्रसंगी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.यावेळी काेराेना संसर्ग बाबत शासनाचे सर्व निकष पाळण्यात आले सदर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांचा वाटप सोहळ्यांचे संपुर्ण शिस्तबद्ध नियोजन रवि रजपुते सोशल फौंडेशनतर्फे" राबविण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post