इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा





प्रेस मीडिया वृत्तसेवा : इचलकरंजी : 

   इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने रविवार दि. १५ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या  प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाला.

त्याचबरोबर या कार्यक्रमा दरम्यान सर्व उपस्थित मान्यवर आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ' माझी वसुंधरा ' हि  शपथ घेतली. शासन आदेशानुसार  कोव्हिड - १९ च्या अनुषंगाने देणेत येणाऱ्या सर्व सुचनांचे पालन करून  झालेल्या  आजच्या मुख्य ध्वजारोहण समारंभा साठी उप नगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्य अधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार,शिक्षण सभापती मनोज साळुंखे, महिला बाल कल्याण सभापती सारीका पाटील, जेष्ठ नगरसेवक सागर चाळके,अजितमामा जाधव, प्रकाश मोरबाळे, शशांक बावचकर, राहुल खंजीरे, माजी उप नगराध्यक्ष रवी रजपुते, माजी नगरसेवक महादेव गौड, उप मुख्याधिकारी केतन गुजर, लेखापाल कलावती मिसाळ, लेखापरीक्षक प्रमोद पेटकर, नगर अभियंता संजय बागडे, कामगार अधिकारी विजय राजापुरे,सहा.नगर रचनाकार रणजित कोरे, एन.सी.सी.चे मेजर मोहन वीरकर , शाहू  हायस्कूल  मुख्याध्यापक शंकर पोवार, सरस्वती हायस्कूल चे संगीत शिक्षक  जितेंद्र कुलकर्णी, संजय परीट यांचेसह डि.के.ए.एस.सी महाविद्यालय आणि सरस्वती हायस्कूल कडील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी यांचेसह  मान्यवर उपस्थित होते.


     

Post a Comment

Previous Post Next Post