इचलकंरजी येथील तीस लाभार्थ्याचे रमाई आवास योजनेतुन घराचे स्वप्न हाेणार साकार.



इचलकंरजी प्रतिनिधि श्रीकांत कांबळे. 

मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्याना घर बांधणीसाठी रमाई आवास योजना राबवली जाते या योजनेतुन इचलकंरजी येथील तीस पात्र लाभार्थ्याना घर बांधकामाचा निधी लवकरच मिळणार आहे अर्थ मंत्रालयातुन त्याबाबतच्या प्रस्तावाला अंतरिम मंजुरी मिळाली आहे यासाठी मा. उपनगराध्यक्ष रवि रजपूते यानी पाठपुरावा केला आहे या तीस घराच्या बांधकामसाठी सुमारे 75लाख रुपयांचा निधी प्राप्त हाेणार आहे कोल्हापुर जिल्हातील 221 प्रस्ताव मंजुर असुन त्यापैकी ग्रामीण भागातील घराच्या बांधकामाचा निधी आला आहे. तर शहरी भागातील पात्र लाभार्थ्याच्या निधीचा प्रश्न राज्य शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडे प्रलबित होता. याबाबत रवि रजपूते यानी कॉग्रेसचे नगरसेेवक मा. राहुल खंजीरे याना सोबत घेऊन पालकमंत्री मा. सतेज पाटील याच्याशी संपर्क साधुन वस्तुस्थिति कथन केली. 

त्यावर मा. पालकमंत्री पाटील यानी अर्थ मंत्रालय आणि सामाजिक न्यायमंत्री मा. धनंजय मुंडे याच्याशी संपर्क साधुन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. याच कामातील पहिला टप्पा म्हनुन 26अॉगस्ट रोजी वित्त मंत्रालयाकडुन 20कोटीचा शासन (G.R.)जारी करण्यात आला आहे. या कामात पुणे समाजकल्यान खात्याचे उपयुक्त मा.कदम-पाटील आणी मुंबईतील समाजकल्याण विभागाच्या उपयुक्त मा.देशमुख मैडम यांनीही खास सहकार्य केले. त्यानुसार इचलकंरजी शहरातील तीस घराच्या बांधकामसाठी 75लाख रुपयाचा निधी लवकरच संबंधित लाभार्थाच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे रवी रजपुते यानी पत्रकार परिषदमध्ये स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post