प्रेस मीडिया वृत्तसेवा :
हुपरी येथील, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील प्रांगणात आज ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त *जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब* यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी यळगुड चे उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, संचालक आडगोंडा पाटील, जिणगोंडा पाटील, सुकुमार किनिंगे, बसगोंडा पाटील, अभयकुमार काश्मिरे,आण्णासो गोटखिंडे, दादासो सांगावे, शितल अम्मन्नावर, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे,सुमेरू पाटील, कमल पाटील, वंदना कुंभोजे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, नगरसेवक सुरज बेडगे, नगरसेवक गणेश वाईगडे, नगरसेविका रेवती म. पाटील, तंबू रावण, नगरसेवक प्रतापसिंह देसाई, पैसाफंड बँक संचालक प्रकाश जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी व कारखाना कार्यस्थळ परिसरातील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.