हातकणंगले तालुका प्रतिनिधी + आप्पासाहेब भोसले
निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने 19 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता सांगली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मागणी करण्यात आलेली आहे की, covid-19 लॉक डाऊन मध्ये मागील वर्षी आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनाने नोंदीत बांधकाम कामगारांना प्रतेकी पाच हजार रुपये दिले होते. या वर्षी मात्र फक्त पंधराशे रुपये दिले आहेत. उर्वरित साडेतीन हजार रुपये रक्कम मिळावी. बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत असा निर्णय दोन वर्षांपूर्वी केलेला आहे की, नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 50 हजार रुपये देण्यात येतील. अनेक वेळा संघटनांनी मागणी करूनही कामगार मंत्री व महाराष्ट्र शासनाने अद्याप या महत्वाच्या ठरावास मंजुरी दिली नाही. विशेषता सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळआकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अकरा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. तरीही निर्णय होत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मेळाव्यामध्ये निषेध करण्यात आला.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची ऑनलाईन सर्व कामे जलद व वेळेवर होण्यासाठी सुविधा केंद्रे सुरू केले जातील अशी घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र सांगली जिल्ह्यामध्ये अजूनही संगणकीकरण सुविधा केंद्र सुरू झालेले नाही. तसेच इतर अनेक जिल्ह्यांमध्ये नोंदीत बांधकाम कामगार यांच्यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू झालेली आहे परंतु सांगली जिल्ह्यामध्ये मात्र अद्याप एकही बांधकाम कामगारांच्या साठी मध्यान्ह भोजन योजना शासनाने सुरू केली नाही. ती ताबडतोब झाली पाहिजे अशीही मागणी आहे. मागील दोन वर्षांपूर्वी 2019 च्या महापुराच्या वेळेस महाराष्ट्र शासनाने असे घोषित केले होते की, महापुरा मध्ये ज्या नोंदीत बांधकाम कामगारांची घरे बाधित झालेले आहेत त्यांना घर बांधण्यासाठी तातडीने दोन लाख रुपये देण्यात येतील. परंतु सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकाही बांधकाम कामगारांच्या घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळकडे तरतूद व योजना असूनही त्याची अंमलबजावणी केली नाही. वरील सर्व मागण्या संबंधी बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, तारीख १४/८/२०२१रोजी मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले होते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तारीख १५/८/२०२१ रोजी त्वरीत निवेदन मिळाल्याचे सांगून ते निवेदन शासनाच्या कामगार विभागाकडे पाठवलेले आहे असे संघटनेचे कळवलेले आहे. संघटनेने निवेदन पाठवले म्हणून धन्यवाद दिले आहेत.
परंतु त्या निवेदना बाबत कामगार मंत्र्यांनी काहीहि प्रतिक्रिया अद्याप दिली नाही. आणि मागणी करून याबाबत बैठक आयोजित केली नाही म्हणूनच वरील सर्व बांधकाम कामगारांच्या अन्यायाविरुद्ध बांधकाम कामगारांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी एक सप्टेंबर २०२१ रोजी ठीक सकाळी अकरा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी जमावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये युनियनचे सरचिटणीस कॉ विजय बचाटे इतर पदाधिकारी वर्षा गडचे, शितल मगदूम, सुरेश सुतार, राम कदम, प्रकाश कुंभार, सोमलिंग आयवळे, उत्तम पाटील, देविदास राठोड, गवंडी व तुकाराम मोहिते इत्यादींनी चर्चेमध्ये भाग घेऊन आपली मते मांडली.