हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
शिरढोण तालुका शिरोळ येथे माणुसकी फौडेशनच्या वतीने आरोग्य शिबिर,नेत्र तपासणी,मोफत औषध उपचार शिबिर घेण्यात आले.केअर हाॕस्पिटल कोरोची यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी पी एच डी प्राप्त डॉ. ज्ञानेश्वर कांबळे सर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी माणुसकी फाउंडेशन इचलकंरंजी मध्ये कोरणा व पूरग्रस्तांना मदत केल्या केल्याबद्दल संपूर्ण टिम चा सत्कार करण्यात आला . यावेळी रवी जावळे,प्रविण केर्ले,राजेखान नदाफ, प्रथमेश इंदुरकर, बंडा पाटील, ,प्रा.डाॕ:ज्ञानेश्वर कांबळे,शक्ती पाटील (ग्रा.पं सदस्य) अविनाश पाटील पत्रकार दिलीप कोळी आदिंनी मान्यवर मनोगते व्यक्त केली
या ठिकाणी सरपंच चंद्रकांत चव्हाण उपसरपंच संभाजी कोळी ग्रामपंचायत सदस्य रवि कांबळे शशी चौधरी शक्ती पाटील पोलिस पाटील अनुराधा जाधव माझी डेप्युटी राजेखान नदाफ विश्वास शिंगे अजित चौगुले सतिश भंडारे उपस्थित होते स्वागत व सुत्रसंचालन दिंगबर कांबळे यांनी केले तर आभार प्रा.अजित कांबळे यांनी मानले.
यावेळी माणुसकी फौडेशनचे प्रमोद कांबळे, सुयोग कांबळे,विपुल कांबळे,स्वप्निल कोरे, राजकुमार माळकरी,निखिल कांबळे ,निखिल माळकरी,तुषार शिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते