प्रेस मीडिया वृत्तसेवा :
दत्तवाड : प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन येणारा गणेशोत्सव हा सण शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व आखून दिलेल्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी केले . गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजनाबाबत दत्तवाड येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते .
यावेळी उपसरपंच नाना नेजे , पोलीस पाटील संजय पाटील , ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सुतार , देवराज पाटील , नूर काले , किरण सुतार , डी . एन . सिदनाळे , दत्ता पवार , प्रकाश चौगुले आदी उपस्थित होते .