प्रेस मीडिया वृत्तसेवा : दतवाड :
कै. आप्पू दादा नेजे दुधगंगा पतसंस्था दत्तवाड या संस्थेचे संचालक शिवगोंडा आप्पासो पाटील व माजी संचालक त्यांच्या पत्नी सौ विमल पाटील या दाम्पत्यानी रमेशकुमार मिठारे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.मिठारे हे शिरोळ तालुका पतसंस्था सेवक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत असुन तालुक्यातील पतसंस्था कर्मचार्यांना सेवा नियम लागू करणे बाबत संघर्ष करत आहेत.याच बरोबर संघटनेच्या माध्यमातून पतसंस्था नियामक मंडळाच्या जाचक अटी विरोधात तालुक्यातील सर्व पतसंस्थांना भेटी देऊन कुरूंदवाड येथे सहकार परिषद यशस्वी केले .सहकार परिषदेत राधानगरी चे आमदार प्रकाश आबिटकरसाो यांच्या मार्गदर्शनामुळे पतसंस्था समोरील नियामक मंडळाच्या जाचक अटी रद्द होण्यासाठी आवाज उठवून त्याचा पाठपुरावा करत आहेत.
केंद्र शासनाचे *"भारत आत्मनिर्भर रोजगार योजना"* अंतर्गत कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करणे बाबत आवाहन करून तालुक्यातील ७० टक्के संस्थांना योजनेचा लाभ मिळवून दिला असून संपूर्ण महाराष्ट्रातील पतसंस्थाना मिडीया द्वारे मार्गदर्शन करत आहेत.याची दखल घेत पाटील कुटुंबियांनी मिठारे यांचा दत्तवाड येथे सत्कार केला.यावेळी डॉ.गणेश चोथे, फोटोग्राफर- भाऊसाहेब चौगुले, प्रहार आंदोलन दत्तवाड शाखाध्यक्ष-बंडा परिट व पाटील कुटुंबिय उपस्थित होते.