मुलगीच्या हत्येप्रकरणी बापाला पोलिसांनी केली अटक



प्रेस मीडिया वृत्तसेवा : पृथ्वीराजसिंग राजपूत: 

दत्तवाड (ता. शिरोळ) येथे बापाकडून मुलीची हत्या झाल्याची घटना घडल्याची चर्चा दत्तवाड परिसरात सुरू होती. पण, मुलीचे प्रेम प्रकरण मान्य नसल्यामुळे बापानेच मुलीला  दूधगंगा नदी ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

दत्तवाड येथील दशरथ काटकर यांनी आपली मुलगी साक्षी (वय 17) ही बेपत्ता झाल्याची तक्रार कुरुंदवाड पोलिसात दाखल केली होती. परंतु, साक्षी चा मृत्यू  कल्लोळ (ता. चिकोडी) येथील दूधगंगा नदीच्या पात्रात सोमवारी सापडला मात्र, पोलिस चौकशीत तक्रारदार बापच तिचा मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कुरुंदवाड पोलिसांनी दशरथ काटकर याला अटक केली आहे. पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दशरथ काटकर याने 14 ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात आपली मुलगी साक्षी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. काटकर यांनी साक्षीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला होता. काटकरने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस हवालदार अनिल चव्हाण यांना दशरथ काटकरचा संशय आल्यामुळे त्यांनी त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू केली. या चौकशी दरम्यान मुलगी साक्षीचे प्रेम प्रकरण मान्य नसल्यामुळे आपणच तिला जुने दानवाड पुलावरून दूधगंगा नदी पात्रात ढकलून दिल्याची कबुली बाप दशरथ काटकर याने दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी वजीर रेस्क्यू फोर्सचे रऊफ पटेल, सागर सुतार, महिला कॉन्स्टेबल स्वाती जाधव यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबून दोन यांत्रिक बोटीद्वारे दानवाड पासून मांजरी परिसरात शोध घेतला असता यामध्ये कर्नाटकातील कल्लोळ हद्दीत साक्षी चा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या प्रकाराबाबत दशरथ काटकर याला कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता त्याला कलम 302 या कलमानुसार पोलिस कोठडी मिळाली आहे. या हत्येमध्ये असणारे संशयित सविता काटकर या कोरोना पॉझिटिव असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर दुसरा संशयित फरारी आहे. याबाबत कुरुंदवाड पोलीस दशरथ याची सखोल चौकशी करीत आहेत. 

या प्रकरणाचा अधिक तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, बीट अंमलदार अनिल चव्हाण, प्रकाश हंकारे, नदाफ, विजापूरे, मुंडे मॅडम याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post